सुविधा

शैक्षणिक सुविधा–

  • गावाला मराठी शाळा सन 1952 साली गावामाफर्त बांधणेत आली. ती शाळा बांधणेस कै. तुकाराम भाऊ देरे श्री. गणपती तुकाराम जाधव कै. शामराम ज्ञानू हावलदार कै. अण्णा हावलदार कै. रामचंद्र हावलदार कै. गूंडाजी तातोबा सुर्यवंशी, कै बाबूराव तातोबा जाधव, कै. विष्णु ज्ञानू जाधव अशा अनेक लोकांनी सहकार्य केले. त्यावेळीही भिलवडी रेल्वे स्टेशनचे त्यावेळचे पी.डब्लू.जी. नी फार मोलाची मदत केली सहा खोल्यांची इमारत दगड, माती व मंगलोरी कौलाची होती. गावची लोकसंख्या कमी असलेमुळे जुळेवाडी व बुरुंगवाडी अशी संयुक्त शाळा पहिली ते सातवी पर्यंत सुरु झाली.
  • या शाळेत खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन हजारवाडी व बुरुंगवाडी जुळेवाडी या पाच गावचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेवू लागले.
  • सन 1962 साली तत्कालिन विजमंत्री मिरजचे कै. जे.डी. पाटील यांनी गावास विजपुरवठा तातडीने केला. पूर्वी गाव तासगाव विधानसभा मतदार संघात होते. त्यावेळचे आमदार येळावीचे कै. बाबासाहेब गोपाळराव पाटील हे होते. स्वामींनी त्यांना ब्रम्हानंद शिक्षण प्रसारक मंडळ, ब्रम्हानंदनगर ही शिक्षण संस्था तयार करणेस सांगितली. त्यामध्ये कै. बाबासाहेब गोपाळराव पाटील हे अध्यक्ष होते आठवी ते दहावी पर्यंत हे हायस्कूल सुरु होते नंतर पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षणक्रम सुरु झाला.

अंगणवाडी विषयक माहिती.

  1. अंगणवाडी केंद्र क्रमांक–184.
  2. अंगणवाडी भागाचे नांव–गावठान.
  3. अंगणवाडी सेविका–भारती वसंत जाधव.

 

शाळांची माहिती–

  1. प्राथमिक शाळा, बुरुंगवाडी.
  2. ब्रम्हानंद हायस्कूल, ब्रम्हानंदनगर.