व्यक्तिमत्वे

विशेषव्यक्तिमत्व–

श्री. तुकाराम बाबूराव जाधव

  • महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालय या विभागामाफर्त हिमाचल प्रदेशचा दौरा या मंडळाने केला आहे. दिल्ली या ठिकाणी शब्दवेध हा कलाप्रकार सादर करुन त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीच्या हस्ते सत्कार झाला आहे. त्यामध्ये तीन कलाकार याप्रमाणे तुकाराम बाबूराव जाधव–वैधक, आप्पारामा मोरे–रणहाळगी, कै. हिंदुराव रामा मोरे–धुमके.
  • महाराष्ट्रामध्ये मुंबई, नाशिक, पुणे रत्नागिरी, बीड, सोलापूर, सांगली, सातारा अशा अनेक जिल्हयाच्या ठिकाणी कार्यक्रम सादर केलेले आहेत. सत्वाशिल राजा हरीश्चंद्र, सत्यवान सावित्री, राजा विक्रम, लंका दहन, सीता स्वयंवर असे पौराणिक कार्यक्रम फार गाजले होते.
  • त्यातील कलाकार तुकाराम बाबूराव जाधव, विश्वनाथ केशन जाधव, अशोक आनंदा फुके, राजाराम आत्मा जाधव, वसंत नामदेव पानबुडे, विलास पांडूरंग जाधव, जनार्धन कृष्णा गायकवाड, पोपट यशवंत जाधव, कै. नारायण रामचंद्र जाधव, मारुती रघुनाथ शेळके, यशवंत आनंदा जाधव, शंकर कृष्णा चव्हाण, देवानंद पानबुडे इ. संगीताचे सर्व काम श्री. शिवाजी महादेव जाधव यांनी पाहिले स्त्रि कलावंत म्हणून माधवी जाधव–सिने अभिनेत्री, हसीना कवठेकर, मधुबाला तासगावकर, बेबी हुपरीकर, लता पवार, वासंती माळी, प्रभावती कुलकर्णी अशा अनेक अभिनेत्रींनी या कार्यक्रमास साथ दिली.