धार्मिक

धार्मिक–

 • या गावच्या तिन्ही बाजूस परमेश्वराचे छत्र लाभले आहे. ‘पूर्वेस–हनुमान व विठ्ठल रखुमाई मंदिर, उत्तरेस–ग्रामदैवत श्री. म्हसोबा मंदिर, पश्चिमेस सर्व गावाची श्रध्दा असलेले परमपूज्य सद्गुरु ब्रम्हानंद महाराज मठ दक्षिणेला या जाधव समाजाचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री. ज्योतिर्लिंग वाडी रत्नागिरी या डोंगरावरुन गावास आर्शिर्वाद देवून, दक्षिण दिशेची उणीव भरुन काढतो आहे.
 • पूर्वेचे हनुमान व विठ्ठल रखुमाई मंदिर बांधणेस तासगावचे शिंपी समाजातील वायचळकर मामा कै. तातोबा तावदर, कै. नरसू गोपाळा जाधव, कै. बाबूराव तातोबा जाधव, कै. रामचंद्र भवर, कै. गुंडाजी तातोबा सुर्यवंशी अशा अनेक लोकांनी सहकार्य केले. तातोबा सुर्यवंशी अशा अनेक लोकांनी सहकार्य केले त्याला भरीव देणगी रेल्वेचे त्यावेळचे भिलवडी स्टेशनचे पी डब्ल्यू साहेब यांनी दिली
 • गावचे श्रध्दास्थान परमदैवत श्री. सदगुरु ब्रम्हानंद महाराज व रामस्वामी मठ हा सर्वत्र प्रसिध्द देवस्थान आहे.
 • इंग्रजांचे काळाज जुना कौलारु मठ होता. त्यावेळचे स्वातंयसेनानी कै. नाना पाटील, जी.डी. लाड, नागनाथ आण्णा व कै. वसंतरावदादा पाटील कै. स्वामी रामानंद भारती या ठिकाणी आश्रयास या मठात येत असत.
 • भारत देश स्वतंत्र झाला. सन 1960 चे दरम्यान स्व. स्वामी रामानंद भारती या ठिकाणी आले. त्यांना श्री. ब्रम्हानंद महाराजांचे प्रथम दर्शन घेतले. स्वामी रामानंद भारती हे त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष होते. त्याना श्री. ब्रम्हानंद महाराजांनी काय बुध्दी दिली देव जााणे त्यांनी बुरुंगवाडी या खेडयातच रहायचे ठरवले. बुरुंगवाडी या गावचे नांव ब्रम्हानंदनगर म्हणून त्यांनीच घोषित केले.
 • मठ :
  1. मठाचा जिर्णोध्दार करण्यासाठी त्यांनी ट्रस्टची स्थापना केली. त्यावेळचे ट्रस्टी कै. कृष्णा तुकारात माळी, कै. तातोबा काळू माळी, कै. विष्णू ज्ञानू जाधव, कै यशवंत तुकाराम जाधव कै. बाबूराव तातोबा जाधव कै. यशवंत कृष्णा जाधव कै. गुंडाजी तातोबा सुर्यवंशी कै. पांडूरंग गोविंद कोळेकर कै. हंबिरा साधू जाधव येणेप्रमाणे होते. गावच्या व परिसरातील भक्तजनांच्या लोकवर्गणीतून आणि सरकारी मदतीतून आजचा हा ब्रम्हानंद महाराज मठ उभा आहे.
  2. गावच्या पश्चिमेलाच श्री. रेणुका मंदिर आहे. याचे भक्त रामचंद्र पांडूरंग सालुंखे व ठकुबाई–ठकूमावशी, रामचंद्र साळुंखे हे आहेत. या मातेची माघ महिन्यामध्ये यात्रा असते.
  3. अनेक भक्तगण व गावकरी यांचे मदतीने ही यात्रा संपन्न होत असते. या यात्रेस देवाची गाणी रात्रभर गायली जातात. दुसरे दिवशी देवीस गावभर फिरवून ओटी भरण केले जाते. संध्याकाळी सात वाजता देव किचात पडतो. अशी वर्षानूवर्षे या यात्रेची परंपरा आहे.
  4. पूर्वेस हनुमान, विठ्ठल रखुमाई, गणपती व श्रीराम अशा चार मूर्ती असलेले एक देऊळ आहे. चैत्र शुध्द नवमीला राम जन्मकाळ, चैत्र शुध्द पौर्णिमेला हनुमान जन्मकाळ, श्रावणवद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्मकाळ, आश्विन शुध्द प्रतिपदेपासून ते अष्टमीपर्यंत नऊ दिवस व रात्र विना पारायण असते. विणा खाली न ठेवता, दिवसा 12 जण व रात्री 12 जण एक तास विणा घेतात. खंडेनवमी दिवशी या पारायणाची समाप्ती होते. फाल्गुन महिन्यात श्री. संत तुकाराम महाराज वीज साजरी केली जाते. भक्तिमार्गाचे असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात.