धार्मिक सांस्कृतिक

-धार्मिक सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उत्सव–

  • लोककलेची परंपरा या गावाने फार वर्षापासून जोपासली आहे. या लोककलामध्ये रणहालगी लेझील, टिपरीनृत्य, पलिता लेझील, दांडपट्टा, शब्दवेध, घुगुळ नृत्य, मुख्यवटयाचे सोंगी भजन, लोकनाटय तमाशा, वारकरी दिंडी हे प्रकार आहेत.
  • सन 1965 मध्ये श्री तुकाराम बाबूराव जाधव यांचे मार्गदर्शनाने अमरनाटय कला पार्टी ही संस्था कार्यान्वित झाली. सुरुवातीस त्यांनी तीन अंकी नाटके सादर केली. गावामध्ये श्री. ब्रम्हानंद महाराजांच्या यात्रेस हमखास त्यांचा नाटय प्रयोग असायचाच. गावात फाल्गुन शुध्द पहिला सोमवार हा महाराजांच्या यात्रेचा दिवस.
  • गावाची यात्रा भरवणेचे पहिले श्रेय या अमर नाटय कला पार्टीलाच आहे. त्यावेळी प्रयोग सादर करणेसाठी लागणरा खर्च स्वत: कलाकार वर्गणी भरुन यात्रेस कार्यक्रम सादर करीत असत.
  • या मंडळाने पौराणिक ऐतिहासीक सामाजिक कौटुंबिक व लावणीप्रधान नाटके व कार्यक्रम सादर केले आहेत. गावागावात यात्रा गणशोत्सव या ठिकाणी तसेच तालुका व जिल्हा स्तरावर सुध्दा प्रयोग सादर केले आहेत.
  • गावामध्ये श्री. सुभाष विश्वनाथ जाधव यांचे मार्गदर्शनाने आता सिता स्वयंवर हे प्रयोग तसेच अनेक नाटय प्रयोग सादर केले जातात.