ग्रामदैवत

ग्रामदैवत–

  • उत्तरेस ग्रामदैवत म्हणून म्हसोबा देवालय आहे. चैत्राच्या पहिल्या मृग नक्षत्रास या देवाची यात्रा भरते. आंबिल व नैवेद्य झाल्यानंतर गावाच्या मध्यभागी कै. बाबूराव तातोबा जाधव यांचे घरातून पालखी निघते. पालखीचा मान त्यांचे घराण्यास आहे. पालखीस गजनृत्य, लेझीम बॅंड अशी वाद्ये वाजवित पहाटे 4 वाजता मंदिरात जाते.
  • पूर्वी यात्रेस लोकनाटय तमाशा असायचा. पंरतु या नविन युगात तो नाहिसा झाला. देवाची आरती झालेनंतर परत घरी पालखी आणली जाते. आत्ताचे पालखीचे मानकरी श्री. परशराम बाबुराव जाधव व श्री. तुकाराम बाबूराव जाधव हे बंधू आहेत.