इतिहास

इतिहास–

  • सन 1962 च्या अगोदर या गावास ग्रामपंचायत भिलवडीस होती. या गावचा एखादा सदस्य त्या ग्रामपंचायत मध्ये असायचा कै. हंबीरा साधू जाधव कै. पांडूरंग केशव जाधव, शंकराव रामचंद्र साळुंखे यांनी सदस्यत्व केले.
  • सन 1965 ला स्वामींनी बुरुंगवाडी, जुळेवाडी व भिलवडी स्टेशन या तिन्ही गावची ग्रुप ग्रामपंचायत स्थापन केली. पण सरपंचपद व उपसरपंच पद हे जुळेवाडी व भिलवडी स्टेशन यांची एकजूट होवून पाच पाच वर्षे विभागणी केली. बुरुंगवाडीस एकदाही सरपंच अथवा उपसरपंचपद मिळाले नाही त्यामुळे पुन्हा स्वतंत्र ग्रामपंचायत बुरुंगवाडीस मिळाली.
  • सन 1975 साली ग्रामपंचायतीस स्वतंत्र दर्जा मिळाला. परंतु सन 1975 ते 1977 या काळात देशात आणिबाणी जाहीर होती. त्यामुळे निवडणुका झाल्या नाहीत.
  • सन 1978 साली पहिली स्वतंत्र बुरुंगवाडीची निवडणूक झाली. त्यावेळी पहिले बुरुंगवाडीचे सरपंचपद श्री. तुकाराम बाबूराव जाधव यांना मिळाले.
  • स्वामी रामानंद भारतींना भेटणेसाठी क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी. लाड, नागनाथ आण्णा नायकवडी, वसंतराव दादा पाटील असे अनेक क्रांतिकारक येत असत. तत्कालिन केंद्रीय रेल्वेमंत्री के हनुमंतय्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतरावजी चव्हाण यांचेसारख्या थोर पुरुषांचे पाय या गावास लागले.