अध्यात्मिक

अध्यात्मिक माहिती–

 • मौजे बुरुंगवाडी हे गाव पलूस तालुक्यात भिलवडी स्टेशननजिक या ठिकाणी श्री. सद्गुरु ब्रम्हानंद महाराज यांची संजिवन समाधी असून या परिसरातील हे भक्तांचे श्रद्ध्दास्थान असून श्री. सद्गुरु ब्रम्हानंद महाराजांचा जन्म नर्मदा नदीच्या काठी एका खेडयात महादेव व पार्वती यांच्या पोटी झाला ब्रम्हानंद महाराज आठ वर्षाचे असताना आईवडिल परलोकवासी झाले.
 • वैराग्यवृत्ती धारण करुन तिर्थयात्रेला ते बाहेर पडले तिर्थक्षेत्र काशी येथे विश्वानंद मुनींच्या दर्शनाला गेले असता ब्रम्हानंदानी अध्यात्मक प्रसादासाठी जीव आणि परमात्मा याचा परस्पर संबंध काय यामध्ये भगवतांनी जे सांगितले त्यांचे रहस्य काय नऊ दहा वर्षाच्या तेजपुंज मुलांच्या या प्रश्नाचे रहस्य काय या प्रश्नांनी विश्वानंद महाराज स्तंभित झाले. आणि बाल ब्रम्हानंदाना हरिद्वार येथील केशवानंद यांचेकडे घेऊन गेले व त्यांचेकडून त्यांना दिक्षा दिली.
 • नंतर त्यांनी काशी येथे 4 वर्षे नर्मदा तिरावर 1 वर्षे तपश्चर्येत घालविली. नंतर ते दिक्षा घेऊन उपदेश करीत देहू, आळंदी, पंढरपूर, नाशिक, पैठण, गाणगांपूर येथे आले. दत्तात्रयांनी त्यांना दृष्टांत देवून तुम्ही माझाच अवतार, जाई कृष्णतिरावर राहूनी नरसोबाची वाडी, औदुंबर सकाम, निष्काम भक्त, तारावे, कृष्णातिराव कार्य करण्याचे आज्ञा केली.
 • तेथून ते कोल्हापूर, औदुंबर शिराळयाचे गोरक्षनाथ येथून ते कुंडल गावी आले. कुंडलनजिक विरमर्दाच्या डोंगरानजीक स्थिर झाले. त्याठिकाणी काही काळ योगसाधनेत घालविला श्री. ब्रम्हानंद महाराजांनी ढोंगी लोकांचा ढोंगीपणाचा बुरखा फाडला व भक्तांना साक्षात्कार करुन उपदेश केला मानवधर्माची दहातत्वे धैर्य, क्षमा, संयम, चौर्यकर्म न करणे, पाविय, बुद्धिश्रेष्ठ, इंद्रियनिग्रह विदया क्रोध नष्ट करणे, सांगितली तेथून ते बोरगाव ता वाळवा येथे काही दिवस स्थिर झाले.
 • तेथून बुरुंगवाडी येथे येवून लोकांना उपदेश केला व लोकांना व्यक्तीच्या आदर्श जडणघडणीसाठी ज्ञान व धर्माचे 10 तत्वांचे आचरण करावे असे सांगितले आश्विन शुद्ध द्वितिया शके 1930 सन 1908 साली बुरुंगवाडी येथे मणत त्यांच्या सर्व भक्त व शिष्यगणांसमक्ष सायंकाळी जिवंत समाधी घेतली व त्यानंतर या ठिकाणी स्वामी रामानंद भारती यांनी या ठिकाणी मणचा जीर्णोद्धार केला तेव्हापासून बुरुंगवाडी ब्रम्हानंदनगर या नावाने ओळखले जावू लागले.
 • ब्रम्हानंदनगर येथे प्रत्येक फाल्गुन महिन्यातील प्रथम सोमवारी साधारणत: मार्च महिन्यातील ब्रम्हानंद महाराजांची यात्रा साजरी केली जाते यामध्ये किर्तन, प्रवचन ग्रंथ पारायण नामस्मरण इ. कार्यक्रम होत असतात.
 • त्यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्य, ब्रम्हानंद महाराज म. विश्वस्त मंडळ,
 • ब्रम्हानंद सर्व सेवा सहकारी सोसायटी,
 • ब्रम्हानंद विदयालय, ब्रम्हानंदनगर इ. संस्था कार्यरत आहेत.
 • अशी ही बुरुंगवाडीची अध्यात्मिक माहिती आहे.

  1. श्री. सदगुरु ब्रम्हानंद महाराजांनी सन 1908 साली या गावात जिवंत समाधी घेतली. त्यांचे महात्म ग्रंथामध्ये आहे. त्या ग्रंथाचे पारायण वर्षाला संपन्न होत असते.
  2. आश्विन शुध्द कार्तिकेला त्यांची पुण्यतिथी साजरी होत असते. सन 2008 ला त्यांच्या समाधीस शंभर वर्षे पूर्ण झाले. त्यांची मूर्ती तयार केलेली आहे. ती मूर्तीप्रतिष्ठापना 2 ऑक्टोंबर 2008 या तारखेस झाली.
  3. यात्रा प्रत्येक वर्षी फाल्गुन शुध्द पहिला सोमवार या दिवशी भरत असते. यात्रेअगोदर आठ दिवस ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरु असतो.
  4. वरील हे दोन कार्यक्रम फार मोठया प्रमाणात साजरे केले जातात.
  5. हरीपाठ, ग्रंथपारायण, प्रवचन, किर्तन असे सांप्रदायिक कार्यक्रम असतात. महाप्रसाद सर्वांना दिला जातो. तसेच प्रत्येक अमावास्येला कुणातरी एका भक्ताचा प्रसाद सकाळी 10 ते 11 या वेळेत असतो.
  6. यासाठी श्री. लक्ष्मण केरु सूर्यवंशी, परशराम बाबूराव जाधव, बापू तुकाराम जाधव, तुकाराम ज्ञानू कोकाटे, गुंडाजी रामचंद्र भवर, अशोक आनंदा फुके, किशोर पांडूरंग भोळेकर, दिलीप ईश्वर जाधव, सदाशिव भिवा तावदर हे सर्वजण व ग्रामस्थ हिरीरीने भाग घेऊन काळजीपूर्वक लक्ष घालून बिना तक्रार कार्यक्रम पार पाडतात.
  7. पुजारी आप्पा तातोबा माळी, वसंत तातोबा माळी, सावंता माळी, लक्ष्मण कृष्णा माळी, आनंदा पांडूरंग माळी हे नित्यनियमाने देवाची पूजा अर्चा सर्व विधी करतात. द्राक्षगुरु श्री. वसंतराव शिवकिंग माळी यांचे सुपुत्र श्री. सुनिल वसंतराव माळी हे मोठया कार्यक्रमामध्ये पुजेसाठी नेहमी असतात.